शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

|| श्रीकृष्ण राऊत विशेषांक ||

अमरावतीला दि.९ जानेवारी २०११ च्या गझलोत्सवातील आनंदसोहळ्यात
मा.नामदार सुशीलकुमारजी शिंदे,उर्जा मंत्री,भारत सरकार यांचे हस्ते
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना डॉ.श्रीकृष्ण राऊत...


जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना डॉ.श्रीकृष्ण राऊत...




*श्रीकृष्ण राऊत*

॥ विशेषांक ॥

_______________________________________________

॥ अंतरंग ॥
_______________________________________________



संपादन : डॉ.किशोर सानप


____________________________________________________




____________________________________________________


दै.लोकमत,मुंबई दि.१० जानेवारी,२०११ वरून साभार

____________________________________________________







दै.गावकरी दि.९ जाने.२०११ वरून साभार




____________________________________________________

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव पुरस्कार









मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो.यंदा हा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जाहीर झाला आहे.९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे होणा-या गझलोत्सवात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.
मागील पस्तीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे.
पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन सत्राचे’ अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे.
दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत.
‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता?’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे.
‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तेरा हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.मराठी साहित्य क्षेत्रात डॉ.राऊत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नारायण गंगाराम सुर्वे नावाच्या निरहंकारी कवीला सलाम

स्वत:लाच रचीत गेलो...

* जन्म : १९२६



*कौटुंबिक आणि पूर्वायुष्य : गंगाराम सुवेर् यांनी सापडलेल्या मुलाला वडिलांची माया आणि नारायण हे नाव दिले - वडील गिरणी कामगार - काही काळ स्वत:ही गिरणीत कामाला त्यामुळे श्रमिकांचे जग जवळून पाहिले- काही काळ शिपाई, प्राथमिक शिक्षक म्हणून नोकऱ्या

* १९५६च्या सुमारास काव्यलेखनाला सुरुवात - युगांतर, नवयुग, मराठा या वर्तमानपत्रांतून कविता प्रसिद्ध

* १९६२मध्ये 'ऐसा गा मी ब्रह्मा' हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध. या संग्रहातील कविता कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर 'लढाऊ वृत्तीची, समाजक्रांतीची उपासना करणारी' होती.

*'माझे विद्यापीठ' (१९६६) हा दुसरा संग्रह. यात 'ना घर ना गणगोत' अशा स्थितीत 'तांबलेल्या, भाकरीसाठी करपलेल्या' उदास वस्तीच्या पोटासाठी झिजणाऱ्यांचे दाहक विश्व- मिळेल ते काम करणारी माणसे, कामगार, वेश्या, पोस्टर चिकटवणारी पोरं अशा समाजातील 'उपेक्षितां'च्या वेदना सजीव करणारी कविता.

* शरच्चंद, विंदा या सुर्व्यांच्या आधीच्या साम्यवादी कवींच्या कवितेतील वास्तवापेक्षा सुर्व्यांच्या कवितेतील वास्तव प्रत्यक्षाला अधिक भिडणारे

* 'जाहीरनामा' (१९७५), 'सनद' (संपादित निवडक कविता १९८२), 'नव्या माणसाचे आगमन' (१९९५) हे संग्रह प्रसिद्ध.

* नारायण सुर्व्यांच्या अप्रकाशित कविता 'नारायण सुवेर् यांच्या गवसलेल्या कविता' या नावाने १९९५मध्ये विजय तापस यांनी संपादित केल्या आहेत.

* 'माणूस, कलावंत आणि समाज' (१९९२) या संग्रहात त्यांचे वैचारिक लेख, अण्णाभाऊ साठे, कुसुमाग्रज, कुरूंदकर आदींबद्दल काही व्यक्तिचित्रात्मक लेख आणि त्यांच्या मुलाखती यांचा समावेश.

*'तीन गुंड व सात कथा', 'दादर पुलाखालची मुले' हे त्यांनी केलेले अनुवाद. तसेच 'कविता श्रमाची', 'गाणी चळवळीची' ही त्यांची संपादित पुस्तके.

* संथ, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी अशी विशिष्ट शैली सुर्व्यांनी निर्माण केली.

* व्यक्तिगत अनुभव आणि सामाजिक जीवनाशी बांधलेली अशी दुहेरी पिळाची सुर्व्यांची कविता जीवनातील दु:खामागे असलेले, समाजरचनेतील विषमता, हे कारण जाणते. त्यामुळे त्यांच्या कवितेत मार्क्सवादी दृष्टीकोन.

*जग बदलून टाकण्याच्या माणसाच्या क्षमतेवरील विश्वास, जीवनातील आव्हाने पेलण्याच्या ताकदीवरील श्रद्धा यातून त्यांच्या कवितेत आशावाद.

* मराठी कवितेला मध्यमवगीर्य वर्तुळातून बाहेर काढण्याचे काम सुर्व्यांच्या कवितेने केले.

*राज्यभरात गावोगावी जाऊन कवितांचे कार्यक्रम सुर्व्यांनी केले. त्यांच्या कवितेला समाजातील सर्व स्तरांतील लोकांची पसंती मिळाली.

(म.टा.वरून साभार)

योद्धा! : नामदेव ढसाळ

नारायण सुर्वे यांच्या निधनामुळे मराठी साहित्यातील सांस्कृतिक मिरासदारीविरोधातल्या लढाईत शीर्षस्थानी असलेला कवी , योद्धा हरपला आहे ... या भावना नोंदवल्या आहेत ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांनी .
...................

सुर्वेसर गेल्यानंतरच्या बातम्या मी टीव्हीवर पाहात होतो . मान्यवर कवी - समीक्षकांनी त्यांच्याबद्दलचा लावलेला सूर मजेशीर होता . ते म्हणत होते , ' सुवेर् यांच्या निधनाने सूर्यास्त झाला .' सुर्वे हे स्वत : ला सूर्यकुलातले कवी म्हणायचे . शोषित - कष्टकऱ्यांचं जग साहित्यात प्रस्थापित करताना त्यांनी सूर्याची प्रतिमा सतत वापरली . या प्रतिमेची नुसती द्वाहीच फिरवली नाही , तर तीही प्रस्थापित करण्याचा जिवंत प्रयत्न केला . हे सूर्यतेज साहित्यात आता अधिक प्रखर झालं आहे . त्यामुळे सुवेर्सरांच्या जाण्याने सूर्यास्त झाला , असं मी म्हणणार नाही . त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यातील सांस्कृतिक मिरासदारीविरोधातल्या लढाईतला शीर्षस्थानी असलेला कवी हरपला , असं मात्र मी नक्कीच म्हणेन .

कुर्निसात

मराठी साहित्यात दलित - शोषितांच्या वेदनेला , दु : खाला फारसं स्थान नव्हतं . तिथे मोठीच पोकळी होती . पण नारायण सुर्वेंनी मार्क्सवाद हे आपल्या साहित्याचं अधिष्ठान बनवत सांस्कृतिक मिरासदारीविरोधाच्या लढाईत उतरत मराठी साहित्यातला मोठाच खड्डा बुजवला , ही साहित्याला ललामभूत ठरणारी गोष्ट आहे . ही लढाई अटळ आहे आणि अजूनही ती अंतिम टप्प्यात आलेली नाही . मराठी कवितेला स्वप्नरंजनातून सोडवण्याचं मोठं काम मढेर्करांनी केलं तरी वास्तवातले अंतविर्रोध पकडून दलित - शोषितांच्या अभिव्यक्तीला स्थान देण्याचं काम त्यांनी केलं नाही . त्यांच्या आधी केशवसुतांनी ते केलं . केशवसुतांवर ' गोल्डन ट्रेझरी ' वाले कवी म्हणून टीका होते ; पण आधुनिक मराठी कवितेची सुरुवात त्यांच्यापासून होते . त्यांनी मानवी मूल्यांना तात्त्विक बैठक दिली हे नाकारता येणार नाही . सौंदर्यवादी आणि जीवनवादी असे प्रवाह तेव्हाही साहित्यात होते . त्याला साठच्या दशकात थेट प्रस्थापित विरूद्ध बिगर प्रस्थापित असं स्वरूप येऊन जी झुंपी झाली त्यात नारायण सुवेर् अग्रभागी होते .

सुर्वेसर मला दीपस्तंभासारखे वाटतात . आम्ही जी लढाई लढत होतो तीच सुर्व्यांचीही लढाई होती , त्यामुळे आमचे ऋणानुबंध होते . मी सुर्वेंच्या बाबतीत मनस्वी होतो . मला आठवतं , ते चिंचपोकळीच्या पुलावरून येत होते . मी समोरून येत होतो . त्यांना बघताच मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला , अशी आमच्या पहिल्या भेटीची आठवण आहे . आम्ही जीवनवादी लोक प्रतिभेला दैवी देणगी मानत नाही . प्रतिभा ही खडतर जीवनातून अधिक परिपक्व होते , स्वत : कडे आणि समाजसंबंधाकडे डोळसपणे पाहिलं तर द्विगुणित होते , असं मी मानतो . सुवेर् याचं साक्षात उदाहरण आहेत . त्यामुळेच त्यांची भाषाही जबरदस्त झाली .' ऐसा गा मी ब्रह्मा ' मधल्या त्यांच्या कविता अप्रतिम आहेत . कामगार जाणिवेने भारलेल्या आहेत . साम्यवादी राजकीय बांधिलकी मानणाऱ्या या कवीने शब्दांचा हत्यारासारखा वापर केलेला दिसतो . ' इथून शब्दांच्या हाती खड्ग मी ठेवीत आलो ', असं ते म्हणतात . कवितेची चळवळ चालवत सदा कऱ्हाडे , बाबुराव बागुल , प्र . श्री . नेरूरकर , सुभाष सोमण , केशव मेश्राम यांना घेऊन प्रगत साहित्य सभेचं धुरिणत्व स्वीकारतानाही दिसतात .

माझा सुर्वेच्याबद्दल आक्षेप फक्त एवढाच आहे की कामगारांच्या बालेकिल्ल्यात राहून सत्तरच्या दशकापर्यंत तिथली सगळी स्पंदनं प्रभावीपणे टिपणारा हा कवी तिथेच नंतर झालेले राजकीय बदल आणि कामगार वर्गातली स्थित्यंतरं याबाबत मूक राहतो . चळवळीचं अध : पतन होताना त्यातले अंतविर्रोध मांडत नाही . पुढच्या अपयशाबद्दल बोलत नाही . अर्थात असं असलं तरीही सर्वहारांचा लढा साहित्यात प्रस्थापित करण्याचं मोठंच काम सुर्वेंनी केलं आहे . त्यांनी या लढाईला आरंभ केला आणि ती व्यापक केली . याबद्दल आम्ही त्यांचं उत्तरदायित्व मान्य करून त्यांना कुर्निसात करतो .

(म.टा.वरून साभार)

'माझे विद्यापीठ'विषयी...

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती...' अशा ओळींनी प्रारंभ होणारी नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे जणू कव

ीचे आत्मचरित्रच. विलक्षण गाजलेली ही कविता कशी रचली गेली... तिला कशी प्रसिद्धी मिळाली, हे खुद्द सुर्वे यांच्याच शब्दांत...
................

काही काही कविता विलक्षण रसायन जमून यावे, तशा चपखलपणे स्वत: व्यक्तित्त्व घेऊनच व्यक्त होतात. आशय शब्दांचे बोट धरून चालतो, की शब्दच आशयाला खांद्यावर उचलून मिरवत नेतात, हे कळेनासे होते. इतका एकवटलेपणा, एकजिनसी अनुभवांचा विलक्षण पट तयार होतो. मालिका तयार होते. अशा रचनेतील एकही शब्द इथे तिथे सरकला, किंवा जरा धक्का त्याला लागला की, सारेच कोलमडून पडले असे वाटत राहते. नवा विलक्षण पोत आपणासमोर रचनेच्या रूपात उभा राहतो. 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे ७२ ओळींची दीर्घ रचना आहे. एकूण चार बंधांत ती बांधली गेली आहे व अठरा ओळींचा एकेक बंध व त्यातील ताणेबाणे दुसऱ्या बंधाशी जोडीत ती निखळपणे विणत जाते. कवी जर स्वनिमिर्तीशी प्रामाणिक असेल व कवितेला कवितेच्या, म्हणजेच तिला तिचे स्वातंत्र्य देऊन निखळ रूपात बोलू देणार असेल, तर ती अधिक मोकळी होते, अधिक सच्ची होते. काळाच्याही पलिकडे पाहण्याची, उड्डाण करण्याची क्षमता तिच्यात येते, असा माझा अनुभव आहे. कविता लिहिणे ही एक जोखीमच आहे, असे मी मानतो. ती एक गंभीर गोष्ट आहे. नवसृजन आहे. तिच्यावर कसलेही सावट न येईल याची काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ या सर्व प्रक्रियेपासून कवी अलिप्त राहू शकतो का? त्याचे उत्तर होय आणि नाही असेच द्यावे लागेल. कारण निमिर्तीत देखील रचनात्मक आंतरद्वंद्व असते. तो रचनात्मक संघर्षच असतो. सडेपणा आणि कलात्मकता याचे भान ठेवावेच लागते. दीर्घ रचनेत हा तोल सांभाळावाच लागतो. तसे पाहिले तर 'माझे विद्यापीठ' कवितेने मला फार दमवले आहे. उणेपुरे एक वर्ष मी ही कविता लिहित होतो. कुणाला हा मूर्खपणाही वाटेल. तो माझ्या निमिर्तीबाबत वारंवार घडतो खरा! परंतु मला त्यात समाधान वाटते. एखादी कविता उत्तमपणे माझ्याकडून लिहिली गेली, की त्या पलिकडे कोणताही सवोर्च्च आनंद मी मानत नाही.

'माझे विद्यापीठ' या कवितेचा शेवटचा अठरा ओळींचा बंध माझ्याकडून आधी रचला गेला. 'निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी' या अठरा ओळींच्या शेवटच्या ओळीतले शब्द 'कधी दोन घेत, कधी दोन देत' होते. खरे तर ही कविता इथेच संपत होती. मग तिची सुरुवात कुठे? मी चक्रावून गेलो. वर्षभर या कवितेभोवती मी घुमत राहिलो. पुन्हा पुन्हा वरील ओळींचे अर्थ व संदर्भ शोधत मी एकदाचा 'ना घर होते, ना गणगोत' या पहिल्या कडव्यातील पहिल्या ओळीच्या रचनेने सावरलो आणि कविता मनासारखी पूर्ण करून मोकळा झालो. त्यानंतर सहा महिने मी एकही ओळ लिहिली नाही इतका कातावून गेलो. असो.

ही कविता एकदाची लिहून झाली खरी; परंतु ती प्रकाशित कोण करणार, हा प्रश्न माझ्यासमोर होताच. आधीच काव्याविषयी उदासीनता. त्यात मी पडलो नवखा कवी व कोणत्याही मासिकाची ओळखपाळख नसलेला. बहुतेक नियतकालिके जाहिराती आधी छापतील व कविता नंतर. विचार केला तर त्यांचेही असे करणे चूक नाही व कविता प्रकाशित करणे आवश्यक आहे का, हा आग्रहही चूक नाही. कविता काही उत्पादक गोष्ट नाही आणि जाहिरातीवर तर नियतकालिके उभी राहतात, चालतात, हा अनुभव सार्वत्रिकच आहे. शिवाय ही कविता नीट प्रकाशित करायची म्हटले, तर मासिकाची दोन पाने तरी लागणारच. मोठा पेच होता.

दुसऱ्याच दिवशी मी प्रा. केशव मेश्राम यांना भेटलो. मी जेव्हा जेरबाई वाडिया, परळ येथील बोगदा चाळीत राहात असे, खरे तर या चाळीला अंधार चाळ म्हणणेच योग्य होईल, प्रा. मेश्राम तेव्हा म्हात्रे पेन्सच्या शेजारील बैठ्या चाळीत राहत. पस्तिसेक वर्षांपूवीर्ची ही घटना आहे. सेनापती बापट मार्गावरील झोपडपट्ट्या, त्यालगतचे भलेमोठे गटार व वस्त्यांवरचे मिणमिणते दिवे. प्रा. मेश्रामांना 'माझे विद्यापीठ' ही कविता रात्री याच मार्गावरील एका पालिकेच्या दिव्याखाली बसवून ऐकवली होती. त्या सोबतच 'सत्य' नावाची माझी दुसरीही एक कविता मी ऐकवली होती. त्यांना दोन्ही कविता आवडल्या. म्हणाले, 'मला या दोन्ही कविता आत्ताच द्या. माझ्या कॉलेजमध्ये (एम. डी. कॉलेज, परळ) 'सत्यकथे'चे संपादक प्रा. राम पटवर्धन अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिकवायला येतात. त्यांना मीच स्वत: त्या वाचून दाखवतो.'

'अहो, मेश्राम, मला 'सत्यकथे'त कोणीही ओळखत नाही.' मी म्हणालो.

'चालेल, तुमची ओळख मी करून देईन.' प्रा. मेश्राम म्हणाले.

आणि बरोबर चार-पाच दिवसांनंतर मला प्रा. मेश्राम यांच्याकरवी प्रा. राम पटवर्धनांचा 'सत्यकथा' कचेरीत भेटायला या असा निरोप आला. मी सत्यकथा कचेरीत पोहोचलो.

'या. या.' राम पटवर्धन म्हणाले, 'बसा, तुमच्या दोन्ही कविता आम्ही स्वीकारल्या आहेत. 'माझे विद्यापीठ' ही सत्यकथेच्या दिवाळी अंकासाठी व 'सत्य' ही कविता 'मौज'च्या दिवाळी अंकासाठी घेतली आहे. पण तुम्हाला एक विचारू का सुवेर्?'

'बोला.' मी म्हणालो.

'तुमचा पहिला काव्यसंग्रह निघाला आहेच. त्याला पुरस्कारही मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही बरीच वषेर् लेखन करीत आहात; तुम्हाला 'सत्यकथे'कडे लेखन पाठवावे असे का वाटले नाही. मला जरा याविषयी कुतूहल आहे म्हणून विचारतो.' इतके बोलून ते थांबले.

'खरे सांगू, रामभाऊ!' मी म्हणालो, 'तुमच्या 'सत्यकथा' अथवा 'मौज'मध्ये जे लिखाण येते, त्या लेखकांविषयी मला आदर आहेच; परंतु त्यांच्यासारखे मला लिहिता येणार नाही. कारण त्यांचा बाज व लिहिणे निराळे, माझे निराळे.'

'द्या टाळी!' म्हणत रामभाऊ पटवर्धनांनी हात पुढे केला.

'परंतु एक करा. तुम्हाला असे का वाटते याच्याविषयी तुम्ही एक टिपण अथवा लेखच पाठवा. आम्ही तो छापू. तुमची टीकाटिप्पणी आम्हाला हवी आहे.'

मी त्यावर स्वत:चे मत मांडायचे कबूल केले; परंतु अद्याप काही लिहू शकलो नाही. त्यांनीही मला अनेकदा भेट होऊनही पुन्हा कधी हटकले नाही. तेही विसरले, मीदेखील विसरलो.

पुढे 'सत्यकथे'चे प्रकाशनच बंद झाले. माझे लिहिणे आणि त्यांचे छापणे थांबले ते आजतागायत तसेच राहिले.

या 'माझे विद्यापीठ' कवितेविषयी अशा कितीतरी हकीकती आहेत; परंतु एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती अशी :

याच 'मौज प्रकाशन गृहा'तच माझी प्रा. श्री. पु. भागवत यांची गाठ पडली. पुढे अधूनमधून केव्हा तरी फुटकळपणे भेटत राहिलो, बोलत राहिलो. एकदा मला त्यांनी थांबवले. 'तुम्हाला एक विचारू. या कवितेतील ती अंतर्गत लय आहे, तिचा संथसा खळबळ ध्वनी मला ऐकायला येतो, तो तुम्ही कसा साधलात. तेवढे सांगाल?' श्री. पु. म्हणाले.

मी काय सांगणार डोंबल!

मी म्हणालो, मला यातले काही माहीत नाही. मी लिहिले आणि तुम्ही छापले. एवढेच. पुढे १९६६ मध्ये 'माझे विद्यापीठ' या शीर्षकाने माझा नवा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मी भागवतांना एक प्रत भेट म्हणून पाठवली. दोन-चार महिन्यांतच त्यांचे मला पत्र आले ते असे :

प्रिय सुर्वे

संग्रह अगत्यपूर्वक पाठवल्याबद्दल आभार; परंतु मला एक नवल वाटते ते तुम्ही आमच्या 'मौज प्रकाशन गृहा'च्या यादीतून कसे काय निसटलात याचे. ते असो. आता एक करा, जेव्हा या संग्रहाची नवी आवृत्ती प्रकाशित कराल तेव्हा या संग्रहाची मुदणप्रत मी तपासून देईन. तेवढे लक्षात ठेवा.

('डिंपल पब्लिकेशन'च्या 'कहाणी कवितेची' या नारायण सुर्वे यांच्या पुस्तकातून साभार.)

(म.टा.वरून साभार)

सलाम सुर्वेसर : प्रज्ञा दया पवार

सुर्वेसरांच्या निधनाची दु:खद वार्ता कळली आणि आपण काहीतरी मोलाचं असं कायमसाठी हरवून बसलो आहोत, ही जाणीव झाली. कवी देखील माणसंच असतात आणि त्यांचेही पाय मातीचेच असतात हे खरंच. पण सुवेर्सरांसोबत जितक्या वेळी मी होते, जितका काळ त्यांच्यासोबत वावरले, सभासंमेलनात सहभागी झाले, तेव्हा प्रत्येक वेळी हे जाणवत गेलं की हा एक श्रेष्ठ कवी तर आहेच पण त्याआधीही एक 'माणूस' आहे-एक निखळ, निगवीर्, निरसल माणूस. त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातून आणि त्यांच्या कवितेतून घालून दिलेल्या मार्गातून चालणं अवघड तर खरंच पण त्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. समस्त कामगार, कष्टकरी वर्गाची, स्त्रियांची वेदना आणि विदोहाचा हुंकार ताकदीने व्यक्त करणारी त्यांची कविता आजही आमच्या पिढीला दिशादर्शक आहे

क्रांतिकारक समुदायासोबत मिरवणुकीत चालताना जो एक अपूर्व आनंद असतो, एकोपा व आपल्या ध्येयधोरणांचा विश्वास दृढ होत जातो, तो आनंद कोणत्याही ग्रंथापेक्षा मला नेहमीच प्रेरक वाटत आलेला आहे. तेव्हा आम्ही 'आम्ही' असतो आणि समारेचे सगळे जग आमच्या मुठीत असते. तो एक आमच्या इच्छांचा आणि अपेक्षांचा महान उत्सवच असतो, असं सुवेर्सरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. हे मला फार महत्त्वाचं यासाठी वाटतं की आज कवितेमधून हा 'आम्ही'च...एकतर हरवला आहे नाहीतर ढोबळ-प्रचारीपणे अवतरला आहे.

'आम्ही' आणि 'मी' यात कसलंच अंतर नसणं आणि एका गतीमान परिवर्तनाच्या प्रक्रियेशी आंतरिकपणे जोडलेलं असणं हा सुवेर्सरांचा वारसा मी मानते.

सुवेर्सरांच्या सबंध काव्यविश्वाबद्दल खूप लिहिता येईल, निरनिराळी अर्थनिर्णयनं करता येतील आणि ते होतही राहील. पण त्यांच्या कवितेतील स्त्री-रूपांनी मला अधिक प्रभावित केलं आहे, बांधून ठेवलं आहे.

'आता बगा, सांगू का नगं सांगू

असंबी होतंय आन् मला हसूबी येतंय

मागं याक गिऱ्हाईक आलं,

हितं ऱ्हान्यापरीस बाई व्हशील का म्हनलं;

म्या म्हनलं आता मी हाय की तुमज्या शेजंला

तवा ते तरपाटलं, अन मला बगा आख्ख्या पुरुसजातीचं हसू आलं

आन् रडूबी आलं'

आख्ख्या पुरुषजातीचं हसू येणं आणि रडू येणं ही माझ्या मते पुरुषी व्यवस्थेत वावरणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या नात्याच्या प्रतवारीसंदर्भातील अत्यंत करुण आणि वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया तर आहेच पण ती या व्यवस्थेला लगावलेली एक सणसणीत चपराक आहे. 'मनिऑर्डर' या कवितेतील ही स्त्री काय किंवा त्यांच्या कवितेत जागोजागी आढळणाऱ्या असंख्य लढाऊ स्पिरिट असलेल्या कष्टकरी स्त्रिया काय, या सगळ्याजणी माझ्या कवितेत कायमसाठी वास्तव्याला आलेल्या आहेत हे मात्र खरंच.

(म.टा.वरून साभार)

तळकोकणाची बोली सर्वदूर पोहोचवली : मधुसूदन नानिवडेकर

भुईबावडा घाटाच्या पायथ्याच्या वैभववाडी तालुक्यातील 'हेत' हे मुंबईत गिरणी कामगार असलेल्या गंगाराम सुवेर् यांचे मूळ गाव. गंगाराम सुवेर् यांनी नारायणाचा सांभाळ केला. गिरणी कामगार वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या नारायण सुवेर्ंनी अनेक चळवळीत भाग घेऊन फड गाजवले.

सुवेर्ंना या हेतच्या भूमीशी कृतज्ञ राहून इथली किंचित राजापुरी वळणाची मालवणी भाषा, या भागातील स्त्रियांचे अनुभवविश्व आपल्या कवितेतून उभे केले. तळकोकणाची बोलीभाषा सर्वदूर पोहोचवली. 'डोंगरी होतं माझं ग शेत मी बेनू किती' या शाहीर अमरशेख यांनी म्हटलेल्या गीताने त्या काळी रसिकांवर गारूड केले होते. 'कवळाचे भारे बाई घेऊन चढावं किती... आडाचं पानी बाई पानी वडावं किती,' या ओळींतून त्यांनी तळकोकणातल्या स्त्रियांच्या व्यथा मांडल्या. आजही राजापूरच्या हद्दीवरील या डोंगराळ भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या स्त्रिया हेच जीवन जगत आहेत! 'कुठल्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमकते रस्त्यावर.. पाणी आणायला जाऊ की नको, काय ते पत्रात लिवा..' य ागाण्यातून त्यांनी कोकणच्या स्त्रियांची घुसमट व्यक्त केली. मुंबईतला चाकरमानी आणि त्याचे मुलखातले घर यांचा अनुबंध कवितेतून स्पष्ट करत सुवेर्ंनी दक्षिण कोकणच्या श्रमिकांचा आवाज, शेतकऱ्यांच्या जीवनातले बारकावे, ग्रामीण जीवनातले मानवी व्यवहार तथाकथित चाकरमान्यांची ऐट सर्वांचच चित्रण कवितेतून व्यक्त करत आपल्या भूमीतील अनुुभवविश्व सर्वदूर पोहोचवले.

हेत गावच्या शेवरी फाट्यानजीक सुवेर्ंचे घर आहे. त्यांचे चुलत भाऊ येथे राहतात. सुवेर् १९९४ साली हेत या त्यांच्या गावी आले होते. तीन-चार दिवस त्यांनी येथे मुक्काम करून परिसरातल्या मंडळींशी संवाद साधला होता. हेत हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर कार्यक्रमही झाला होता. खारेपाटणपासून ३० किमी अंतरावर हेत गाव आहे. पूवीर् मुंबईहून येताना खारेपाटणला उतरून पुढे चालत जावे लागे. सुवेर् अभिमानाने सांगत, 'मा खारेपाटणचा. अलीकडे वैभववाडी तालुक्याची निमिर्ती झाली, त्यात हेत गावचा समावेश झाला. पूवीर्चा गगनबावडा तालुका..' वैभववाडीचे वैभव म्हणून सुवेर् हा या तालुक्याच्या अभिमानाचा विषय झाला आहे.

(म.टा.वरून साभार)

नाते कवितेचे... : ना. धों. महानोर

नारायण सुर्वे यांच्या निधनामुळे साठोत्तरी मराठी कवितेतील एक धगधगते पर्व अस्तास गेले आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांच्याशी ऋ णानुबंध असलेले ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी जागवलेल्या या आठवणी...
.................

मराठी नवकवितेच्या काळात नारायण सुवेर् यांच्या कवितेने मराठी रसिकांना चांगल्या अर्थाने हादरा दिला. अमर शेख यांच्या डफावर नारायण सुवेर्ंचीही कविता मी विद्याथीर् असताना शेंदुणीर्त ऐकली. त्यावेळी गरिबांची, दु:खितांची आणि सामान्य माणसांची भाषा असलेल्या या कवीशी माझे प्रेम जडले. १९६०च्या काळात फारशी वाङ्मयीन नियतकालिके नव्हती. प्रकाशने नव्हती, त्यावेळी हैदराबाद साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा कविता हा संग्रह काढण्याचे ठरविले. १९६४मध्ये मी चंदकांत पाटील यांच्याबरोबर मुंबईत गेलो. त्यावेळी प्रथम नारायण सुवेर् यांची भेट झाली. कामगारांच्या चाळीतलं त्यांचं छोटसं घर, छोटासा संसार पाहून कळवळा वाटला. 'माझे विद्यापीठ' ही त्यांची मोठी कविता त्यावेळी प्रसिद्घ झाली. कामगार चळवळीतील तुटलेला, फाटलेला माणूस त्यांच्या कवितेमध्ये आला. शेवटपर्यंत या सामान्य माणसांशी नाते, आपल्या कवितेचा पोत त्यांनी कायम ठेवला.

सुवेर् यांच्या अगोदर डावा, साम्यवादी विचार कवितेतून आला. पण एवढा लोकप्रिय झाला नव्हता. नारायण सुवेर् यांनी संत कवीच्या भाषेत साम्यवादी विचाराची कविता लिहिली. आपला क्रांतिकारी विचार त्यांनी तुकाराम आणि सावतामाळी यांच्याप्रमाणे सोप्या भाषेत प्रभावीपणे मांडला. जीवनभर अनुभवलेले दु:ख आणि आसपासची परिस्थिती त्यांनी 'ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती' अशा धाटणीच्या कवितांमधून मांडली आणि ती मराठी मनाला भिडली.

माझ्या आणि त्यांच्या कवितेचे नाते एकच. मी खेड्यातून आल्यामुळे निसर्गातील कुरूपाचे सुरूप, शुद्घ स्वरूपाचे मांडण्याचा प्रयत्न करीत होतो तर गिरणी कामगारांचे दु:ख सुवेर् यांनी त्यांच्या कवितेमध्ये मांडले. खेड्यातील माणूस आणि गिरणी कामगार यांच्या दु:खाची नाळ एकच असल्यामुळे आमच्या दोघांचे आपसुकच नाते जडले.

१९६८मध्ये ग्रेस, नारायण सुवेर् आणि मी यांचे काव्यवाचन पॉप्युलर प्रकाशनने 'रानातल्या कविते'ला पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने ठेवले होते. त्यावेळी प्रत्येकाने दहा-पंधरा कविता पेश केल्या. त्यावेळी प्रथम काव्यवाचनाची सुवेर् यांची ताकद ठसठशीतपणे पुढे आली. त्यानंतर आम्ही दोघांनी किमान पन्नास-साठ ठिकाणी एकत्र काव्यवाचन केले. दोघांची कविता स्वतंत्र होती. पण ती होती सर्वसामान्यांसाठी. नारायण सुवेर् यांनी आपल्या कवितेत विदोह अत्यंत साधेपणाने, संयतपणे मांडला. साठोत्तरी कवितेचा काळ हा मोठा संुदर काळ होता. त्यावेळी अनेक श्रेष्ठ कविमित्रांचे वाद संवाद व्हायचे आणि त्या सर्वांचे म्होरके म्हणून नारायण सुवेर् यांनी काम पाहिले. कवी-कवीमध्ये त्यावेळी संवाद घडायचा, चर्चा व्हायच्या. एखाद्या कवितेमध्ये काही चूक असेल, बटबटीत असेल तर सुवेर् स्पष्टपणे सांगायचे. साहित्यामधील विचार आदानप्रदान करण्याचे निर्मळ असे वातावरण त्यावेळी होते, ते आता अभावानेच दिसते.

नारायण सुवेर् आणि माझी मैत्री प्रदीर्घ काळ होती. सुख-दु:खात होती. आयुष्यातील बॅडपॅचमध्ये आम्ही एकत्र राहिलो. सुवेर् यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीला कबीर जनस्थानापासून अनेक पुरस्कार मिळाले. पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होता आले नाही. दोन वेळा ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडले याची माझ्या मनाला बोच होती. एका प्रतिभावंत कवीला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळत नाही याचे वाईट वाटत होते. दरम्यान, मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असताना परभणीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडून आणले आणि ते अध्यक्ष झाल्याचा मनाला मनापासून आनंद झाला. त्यांचा पहिला मोठा सत्कार संमेलनाच्या अगोदर जळगावमध्ये आम्ही घडवून आणला. या भरगच्च कार्यक्रमात सुवेर् यांनी अनेक नवीन गोष्टींची वेगळ्या पद्घतीने मांडणी केली. गेल्या काही वर्षांत दुदैर्वाने ते सतत आजारी होते. त्यांचे फोनवर अधूनमधून बोलणे व्हायचे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली स्वत:ची कविता, तिचे मूल्य, कवितेचा पोत आणि दर्जा सांभाळला. सुवेर् आणि माझे काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले. या मैफिलीतून सुवेर् निघून गेल्याचे मनापासून वाईट वाटते.

(म.टा.वरून साभार)

सुर्वे कधीच एकटे नव्हते... : जयंत पवार

उस्मान अली, शीगवाला, दाऊदचाचा, याकूब नालबंदवाला, पोर्टर, पोराला घेऊन शाळेत आलेली वेश्या, बेरात्री रस्त्यावर पोस्टर्स डकवत फिरणारी पोरं, बिगारी नाक्यावरचे हमाल, बॉबिनीला तार जोडणारा कामगार... हे सगळे कोण आहेत? रस्त्यावरच्या ह्या 'टिनपाट' समजल्या जाणाऱ्या माणसांना मराठी साहित्यात कोणी आणलं आणि पुस्तकांतल्या ओळीत सन्मानाने बसवलं? हा प्रश्ान् कधीकाळी मराठी सारस्वत जगताला पडलाच असणार. पण आपल्या आगमनातच नारायण गंगाराम सुवेर् नावाच्या माणसानं सांगून टाकलं, 'कामगार आहे मी तळपती तलवार आहे/ सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे'. तो आला. आपलं कामगारपण घेऊन आला. आपलं अनाथपण घेऊन आला. आपल्या रोखठोक आणि बोलभाषेतल्या शब्दांसह तो आला आणि त्याने मराठी सारस्वतांच्या अनुभवाच्या परिघाबाहेरचं विश्व त्यांच्यासमोर ओतत आपले बिरादर मराठी साहित्यात आणले. एखाद दिवशी एक नवाच दादा गल्लीच्या तोंडावर अवतरतो आणि 'है आवाज...' म्हणत ललकारतो तसा सुर्व्यांचा खणखणीत आवाज मराठी साहित्यात साठच्या दशकात घुमला. आज हा दादाकवी इहलोक सोडून गेला आहे आणि त्याचे शीगवाला, उस्मान, याकूब, पोर्टर अनाथ झाले आहेत.

स्वत: नारायण सुवेर्ंनी हे अनाथपण खोलवर अनुभवलं आहे, झेललं आणि साजरंही केलं आहे. चिंचपोकळी येथे गिरणीच्या तोंडावरच त्यांची जन्मदात्री त्यांना टाकून गेली होती. गंगाराम सुवेर्ंनी हे अनाथ पोर उचललं आणि घरी आणलं. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापर्यंत सांभाळलं आणि एके दिवशी त्याच्या हातावर दहा रुपये ठेवून ते कुटुंबासह गावी निघून गेले. नारायण पुन्हा अनाथ झाला. 'ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती' हे वास्तव जगू लागला. आयुष्याच्या नव्या धुमाळीत उघड्या आकाशाखालचं जग हेच त्याचं विद्यापीठ झालं आणि या विद्यापीठात उघड्या डोळ्यांनी शिकता शिकता 'माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय' बिनदिक्कत लिहिण्याइतका मोठा कवी झाला. सुर्व्यांनी आपल्या या अनाथपणाची नाळ थेट कबिराशी जोडून घेतली. कबीरही त्याच्या आईबापाला टाकून दिलेल्या अवस्थेत सापडला होता. एका विणकरानेच त्याचा प्रतिपाळ केला आणि 'कबिरा खडा बाजार में लिए कटोरा हाथ' असं म्हणत आपलं भणंगपण साजरं करत एक युगविधान करणाऱ्या कवीमध्ये तो परावतिर्त होत गेला. सुवेर् नेहमी आपल्या भाषणात कबिराची साक्ष काढत आणि त्याच्या-आपल्या अनाथपणाचा एकत्रित उल्लेख करत.

कवी-लेखकाने आपलं एकटेपण मिरवायची एक फॅशन मराठीच नव्हे, सगळ्या भाषांतल्या साहित्यिकांत होती. एकटेपणा-बरोबरच दु:खही त्यालाच घट्ट लपेटून माणसाच्या आयुष्यात प्रवेश करतं, हाही एक क्रिएटिव्ह लोकांचा आवडता समज. सुवेर् तर मानसिकदृष्ट्याच नव्हे तर भौतिकदृष्ट्याही एकटे होते. वडील त्यांना पोरवयात सोडून गावी गेल्यानंतर ते चाळीच्या जिन्याखाली झोपायचे. एका सिंधी माणसाने ह्या एकट्या पोराला पाहून 'क्या करता है?' विचारलं. पोरगं म्हणालं, 'कुछ नई. कोई नही है मेरा'. त्यावर सिंध्याने त्याला आपल्याकडे नेलं आणि झाडू मारायचं काम दिलं. तिथून पोरगा एका पारश्याकडे गेला. त्याच्या मुलाला शाळेतून आणणं, बाजारहाट करणं, असं काम करू लागला. शेजाऱ्यांची भांडीकुंडी घासू लागला. मग कधीतरी दादरच्या कोहिनूर मिल नं. ३ मध्ये रात्रपाळीत बालकामगार म्हणून रूजू झाला. पोटासाठी दोन घास मिळावेत एवढ्याचसाठी ही कोण धडपड. तीही एकटेपणाने केलेली. राग, अपमान, अवहेलना आणि आत्मवंचना यांचीच या प्रवासात सोबत. असा माणूस आत्मानुभवातून साहित्य प्रसवतो तेव्हा त्यात ह्या दु:खाचं विदारक दर्शन असणारच ना! पण सुर्व्यांचं वेगळेपण आणि थोरपणही हेच की त्यांनी या कटुतेचा गाळ आपल्या साहित्यात येऊ दिला नाही, उलट आपली आत्मपरता समूहात विलीन करून टाकली आणि समष्टीची वेदना स्वत:ची म्हणून मांडली.

हे कसं काय झालं असेल? मिलमध्ये काम करताना गंगाराम सुर्व्यांच्या नातेवाईकाने त्यांना युनियनच्या ऑफिसात झाडू मारण्याचं काम देऊन तिथेच राहायची सोय केली, त्यांना युनियनची पावती फाडायला लावली. हे निमित्त झालं आणि सुर्व्यांना कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाची गोडी लागली. मार्क्स भेटू लागला. तू एकटा नाहीस, तुझ्यासारखे खूप आहेत गांजलेले, असं सांगू लागला. त्यातूनच त्यांना चळवळीची गोडी लागली. ते नाविकांच्या बंडात रस्त्यावर उतरले. पुढे स्वातंत्र्य आंदोलनात 'पीपल्स व्हॅालेंटियर ब्रिगेड'मध्ये बिनदिक्कत सामील झाले आणि लाठ्यांचे धनी झाले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात प्रचार करत फिरले. त्यात गाणी लिहू लागले. एकटे असलेले सुवेर् समूहाचे झाले.

अर्थात यात स्वत:विषयी विचार करायला त्यांना वेळच मिळाला नसेल, असं नाही. त्यांच्या 'ऐसा गा मी ब्रह्मा' कवितेत 'गलबलून जातो तेव्हा तुझ्याच कुशीत शिरतो' यासारख्या भावनिक ओळी आहेत. त्यांनी स्वत:बद्दलही वारंवार विचार केल्याचं त्यांच्या कवितेतून दिसतं. पण हा स्वत:चा विचार त्यांनी एक व्यापक पट समोर ठेवून केल्याचं दिसतं. यात त्यांच्यातलं मुळात असलेलं लढवय्येपण कायम दिसतं आणि त्याचबरोबर करूणाही दिसते. लहानपणी त्यांना अनाथ करून गेलेल्या मातेच्या उल्लेखातही त्यांनी कधीच कटुता येऊ दिली नाही. पोरवयात मुंबई शहरात त्यांना एकटं सोडून जाणाऱ्या गंगाराम सुवेर्बद्दल राग तर नाहीच उलट अपार कृतज्ञता आहे. याच करुणामय दृष्टीने सुर्व्यांनी आपल्या अनुभवविश्वात वावरणाऱ्या रस्त्यावरच्या फाटक्या माणसांशी वागताना, त्यांचं कवितेत चित्रण करताना बाळगली आणि म्हणूनच त्यांची कविता मोठी झाली. सुवेर्ंनी आपल्या समकालिन आणि विरोधी विचारांच्या लेखक-कवींनाही आदराने वागवलं. पुढे वयपरत्वे त्यांनी वादात न पडता कधी कधी समजुतीचा आणि समझोत्याचा सूर लावला तेव्हा ते टिकेचे धनीही झाले पण हे सौम्यपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच झिरपल्याने ते सर्वसमावेशक झाले आणि सर्वांनी त्यांना स्वीकारलं.

सुवेर् कविता म्हणायला उभे राहायचे तेव्हा सभा स्तब्ध व्हायची. 'तुमचंच नाव लिवा' असो की 'असं पत्रात लिवा', 'गिरणीची लावणी असो' की 'मढेर्करांशी बातचीत असो' त्यांचा शब्द झेलायला सगळे आतुर असायचे. असा दरारा त्यांनी आपल्या सौम्य पण जरबदार आवाजाने आणि त्यात पेरलेल्या मृदू शब्दांनी निर्माण केला होता. सुर्व्यांनी एकंदरीत फार कविता लिहिल्या नाहीत, पण ज्या लिहिल्या त्यातल्या बऱ्याचशा लक्षात राहिल्या. साहजिकच कविता म्हणताना अनेकदा ते त्याच त्याच कविता म्हणत. पण रसिकांनी त्याच त्या कवितांवरही अतोनात प्रेम केलं. ते प्रेम घेत, त्यात सुखावून जात आणि दु:खाचा अजिबात बाऊ न करता सुवेर् कविता म्हणत राहिले. कवितालेखन थांबलं तेव्हाही कधी नेरळला, कधी नाशिकला, कधी ठाण्याला वास्तव्य करत बिनतक्रार जगत राहिले. मृत्यूलाही झुंजवत राहिले. त्या मृत्यूनेही अखेर त्यांच्या झुंजारपणाला लाल सलाम केला असणार.

(म.टा.वरून साभार)

एका विद्यापीठाचा 'कुलगुरू'! : भारतकुमार राऊत

'कामगार आहे मी
तळपती तलवार आहे,
सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे'

नारायण सुर्वे यांनी आपल्या पहिल्याच 'ऐसा गा मी ब्रह्मा' या कविता संग्रहाच्या पहिल्याच 'चार शब्द' या कवितेत आपले गोत्र आणि कवितेचे सूत्रही जगासमोर आणले आणि पुढच्या पाच-सहा दशकात सुवेर्ंचे जे साहित्य प्रकाशित होत राहिले, त्यात याच तळपत्या तलवारीची धार सतत झळाळत राहिली. अनाथ म्हणूनच जन्माला आलेल्या सुवेर्ंनी आयुष्याचे अनेक कंगोरे केवळ पाहिले नाहीत, तर प्रत्यक्ष अनुभवले आणि हेच अनुभव त्यांच्या शब्दांतून वाहत राहिले. मुंबईच्या गिरणी कामगार जगाचा पहिला समर्थ कवी, म्हणूनच सुवेर्ंची कविता जगासमोर आली. पण तिखट आणि कडवट अनुभव वाचकांच्या समोर आणताना सुवेर्ंची लेखणी मात्र शिवराळ झाली नाही. त्यांचे शब्द धारदार, मात्र त्यातली नजाकतही मनाला भुरळ घालणारीच राहिली. जीवनातली वेदना साहित्यात उतरताना शब्दांचे सौंदर्य आणि वजन अचूक टिपायला हवे, हे सुवेर्ंनी मनोमन जाणले असावे. म्हणूनच 'माझे विद्यापीठ', 'सनद', 'जाहीरनामा' या आणि अशा संग्रहातील सुवेर्ंचे अनुभव मनाला विद्ध करणारे असले, तरी त्यातील शब्दरचनेची शिसारी येत नाही, उलट त्यातील अर्थाचे पापुदे प्रत्येक वेळी अधिकाधिक उलगडत जातात.

सुवेर्ंचे दिसणे-बोलणे नेमस्त. सरकारी दप्तरातील एखादा हेडक्लार्क असावा वा तालुक्याच्या शाळेतील हेडमास्तर शोभावा, असा त्यांचा वेष. या गबाळ्यागत दिसणाऱ्या माणसाच्या लेखणीत अन्यायाविरुद्ध खदखदणाऱ्या लाव्हा रसाची शाई भरलेली असेल, असे कोणालाही वाटणार नाही. त्यामुळे विदोहींचे भडक साहित्य संमेलन असो वा मध्यमवगीर्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जत्रा असो, शांत स्वभावाचे सुवेर् साऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून बसू शकत. कोणत्याही विचारांची त्यांना अॅलजीर् नव्हती आणि आपला विचार केवळ आवेशाने आणि टिपेला गेलेल्या आवाजात मांडला, तरच तो जनतेपर्यंत पोहोचतो, यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळेच तथाकथित दलित व बंडखोर साहित्यिकांना ते 'ब्राह्माणाळलेले' वाटायचे. पण सुवेर्ंंना त्याची पर्वा नव्हती. कारण 'बंड' त्यांच्या रक्तात होते.

मुंबईतला गिरणी कामगार जसा झिजत होता, तसेच सुवेर्ंंचे शरीरही झिजत होते. गेली काही वषेर् ते विकारग्रस्त होते. जणू मुंबईच्या श्रमजीवींच्या औद्योगिक आयुष्यासारखाच त्यांचाही जीवनप्रवास चालू होता. मुंबईचे 'उद्यमनगरी' हे विशेषण जाऊन ती 'व्यापारी पेठ' बनली, तेव्हाच सुवेर्ंच्या लेखणीतील लाव्हासुद्धा सुकल्यासारखा झाला. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत त्यांच्याकडून फार मोठे लिखाण झाले नसावे.

रूढ अर्थाने सुवेर् 'नवकवी' या सदरात मोडतात की, नाही, याचा ऊहापोह काही मंडळी उत्साहाने यापुढेही करत राहतील. पण सुवेर्ंची कविता मनाला भिडते आणि भावते, कारण ती सहज समजते. तरीही त्यातील शब्दांच्या छटांचा आनंद मिळवण्यासाठी ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते. त्यात दु:ख, वेदना आहेच, पण त्याचबरोबर जगण्याची उमेदही आहेच आणि त्यासाठी लढा देण्याची तयारीही आहे. 'माझे विद्यापीठ'च्या सुरुवातीच्या चरणांत ते म्हणतात:

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती

दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती'

अशा निराशामय जीवनाची सुरुवात झालेला हा कवी धीर मात्र सोडत नाही. आपल्या या अनभिषिक्त जीवनरूपी विद्यापीठाचे वर्णन करता करता, शेवटी ते म्हणतात:

'आता आलोच आहे जगात, वावरतो आहे या उघड्यानागड्या वास्तवात

जगायलाच हवे; आपलेसे करायलाच हवे; कधी दोन घेत; कधी दोन देत.'

असे दोन घेताना आणि दोन देताना सुवेर्ंचे सारे आयुष्यच वाहून गेले. दुरित आणि पीडिताच्या वाट्यास येणारा जीवनातला विरोधाभास सुवेर्ंंनी कायमच अनुभवला. त्याचे पडसाद त्यांच्या कवितेत उमटत राहिले.

'राईचा पर्वत। पर्वताची राई। दोन्ही मजठायी। सामावली।।' हे त्यांचे उद्गार संत तुकारामाच्या 'अणुरेणु या थोकडा। तुका आकाशाएवढा।।' या तत्त्वज्ञानाशीच नाते साधणारे. पण त्याच कवितेच्या तळाच्या चरणात ते 'ऐसा गा मी ब्रह्मा। विश्वाचा आधार। खोलीस लाचार। हक्काचिया।।' हे वास्तव मांडतात आणि समाजाच्या एका घटकाच्या आयुष्यातील दारूण विसंवाद उघड्यावर येतो.

सुवेर्ंंना त्यांच्या जन्मदात्या आईवडिलांचा थांगपत्ता नाही. पण ज्यांनी त्यांना 'नारायण गंगाराम सुवेर्' हे नाव देऊन वाढवले, ते त्यांचे 'आई-वडील- गंगाराम कुशाजी सुवेर् आणि काशीबाई हे दोघेही मिलमध्येच नोकरीला होते. आठवण आल्यापासून गिरणीच्या दारावर ते जेवणाचा डबा घेऊन जात होते. त्याच्या आठवणी सांगताना सुवेर् रंगून जात आणि भावूक होत चष्म्याच्या ओलावलेल्या काचा पुसत. त्यांच्या कवितेतही या गिरणीचा भोंगा वारंवार वाजत राहतो. तो 'मुंबई' या कवितेत उमटतो, तसाच 'गिरणीची लावणी' गातानाही ऐकू येतो.

ग. दि. माडगूळकरांनी 'जोगिया'मध्ये एका गणिकेची व्यथा मांडली, अण्णाभाऊ साठेंच्या 'माझी मैना'मध्ये गावाकडे राहिलेल्या मैनेची आणि मुंबईत काम करत एकटेपणाचे जीणे जगणाऱ्या चाकरमान्याची विराणी शब्दबद्ध झाली. सुवेर्ंनी 'मनीआडर'मध्ये रस्त्याच्या कडेच्या टपरीत पथारी पसरून गावाकडे पैसे पाठवणाऱ्या वेश्येचे आयुष्य सादर केले. तीन पद्धतीच्या तीन विरहिणी. पण सुवेर्ंच्या 'मनीआडर'ची शब्दकळा कवितेलाच नव्हे, मनाला तितकाच पीळ पाडणारी. कष्टकरी महिलेचं दु:ख सुवेर्ंनी अचूक हेरलं आणि कागदावर उतरवलं. ते करताना त्यांनी जणू स्त्रीमध्ये कायाप्रवेशच केला. 'डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती, आलं वरीस राबू मी मरावं किती' हे शेतकरी गीत किंवा 'माझी आई' ही कविता भारतीय स्त्रीच्या वेदनेचे क्षीण कण्हणेच ऐकवते.

असे सुवेर् काल गेले. कवितांना मागे ठेवून गेले. त्यांची आथिर्क स्थिती विपन्न होती. कर्जाचे डोंगर होते आणि त्यांच्या आजारपणात मुलीला मदतीसाठी उंबरठे झिजवावे लागत होते. एका कवीवर आयुष्याच्या संध्याकाळी अशी वेळ का यावी? आपली ही अवस्था त्यांनी अगोदरच 'पाहिली' होती का? तसे नसेल, तर त्यांच्या 'कर्जपुत्र' या कवितेतील या चरणांची संगती कशी लावायची?

'...एका पुण्यरात्री आलो एका बेडक्यात मेलो

वर्गणीच्या ताटीवरच गुंडाळून गेलो

पुढे आक्रोशती टाळ मागे आम्ही कर्जपुत्र

पुढे पुरून उरले कर्ज देते पुण्यवंत'

(लेखक टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.)

(म.टा.वरून साभार)

गिरणगावातून नेरळपर्यंत...

नारायण सुर्वे यांनी ज्या गिरणगावाची वेदना मांडली ते गिरणगावही आता बदलले. तेथील मिल गेल्या मॉल आले... अखेर या सा-या बदलत्या गिरणगावाला रामराम करून स

ुर्वे नेरळमुक्कामी गेले. एका कवीच्या स्थलांतरानंतर त्यांनी मांडलेले हे विचार...

मध्य रेल्वेच्या नेरळ स्टेशन इथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला आल्यानंतर पद्ममश्री कविवर्य नारायण सुर्वे या परिसराच्या प्रेमात पडले. चार वर्षांपूर्वी केलेला विचार १६ जून २००६ पासून अमलात आणला आणि या ठिकाणी कायमच्या मुक्कामाला यायचं त्यांनी ठरवलं. नवे संकल्प घेऊन सुर्वे यांचे नवे सोबती आणि इथल्या मातीशी कधी एकरूप झालेल्या त्यांचं त्यांनाही उमगलं नाही.

* कर्जत परिसरात वास्तव्याला येण्यामागचं कारण काय ?

जन्माला मुंबईत आलो , वाढलो मुंबईत , महाराष्ट्र आणि जगभर फिरणं मुंबईतून झालं. माझं वय आता सत्तरीच्या पलिकडे आहे , त्यामुळे वाटलं की कुठं तरी स्थिर व्हायला पाहिजे मनात काही संकल्प आहेत. ते लिहायला निवांतपणा हवा म्हणून नेरळला आलो. मुंबईला माणसांची गर्दी आहे , तशी लेखकांचीही गर्दी आहे. या नव्या प्रदेशात माझं स्वागतच झालंय. नव्या प्रदेशातील मनं , माती , शेतकरी मला समजून घ्यायची आहेत. मी शहरी मनाशी संबंधित होतो , आता खेडूत मनाशी जोडला गेलो. इथल्या प्रेमाने आपुलकीने भारावून गेलो. शहराने ते प्रेम-आपुलकी हरवली आहे , हा फरक जाणवला. सहज हाक मारली तरी इथे लोक जमा होतात. मुंबईत लोकांना घाई आहे.

* आजारपणातून आता सावरलात यातून चाहत्यांना वेळ कसा देता ?

जयसिंगपूरला कार्यक्रमाला गेलो होतो. जात असताना वाटेत छातीत दु:खू लागलं. लोणंदला गाडी थांबते. प्रथम टीसीला माझी ओळख दिली. अंग थरथरत होते. माझे आणि कवितेचे सुदैव असे की लोक मला ओळखतात. लोकांच्या प्रेमाने मी बरा झालो. कुणी कार्यक्रमाला बोलावलं तर जातो. नवे सोबती मला भेटायला येतात. त्यांच्याशी गप्पागोष्टी करतो. कविता माणसं जोडते. महिनाभरात माझं आजारपण हटलं , लोकांचे प्रेम कमी झालेले नाही.

* या धबगड्यातून मंुबईची आठवण येते का ?

अर्थात! मंुबईशी नाळ जोडलीये. तिथे जन्माला आलो , ७४ वयाच्या होईपर्यंत मंुबईत वाढलो. ते नातं तुटणं शक्यच नाही. वय वाढल्यानंतर आपण कुठेतरी थांबू या , असं वाटलं. मंुबईत निवांतपणा नाही , तो इथे आढळतो. पण कधी कधी हा निवांतपणाही असह्य होतो , मग मी मुंबईला चक्कर टाकतो. इथल्या निसर्गाच्या सान्निध्यात संकल्प पुरे करताना मी नेहमीच मंुबईच्या संपर्कात आहे.

* पूवीर् आणि आताच्या कवितांमध्ये काही फरक जाणवतो का ?

कविता नव्या शैलीत आपलं म्हणणं मांडायला लागल्यात. पण त्यांच्यात कवितेचे भान कमी आहे असं वाटतं. चांदवडला शरद जोशींनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता , त्यात ७० हजार महिलांनी ' डोंगरी शेत माझं... ' गायलं होतं. कवितेत सामान्य माणसाची अशी नेमकी नस सापडावी लागते.

* हे कम्प्युटरचं युग आहे. नवी पिढी ही वेबसाइवर वाचत असते. असा काही प्रयत्न केला आहे का ?

ताकदीचं लिखाण असेल तर पुस्तकंही खपतात. युरोपात टीव्ही आल्यावर वीस वर्षांनी तो भारतात आला तरी पुस्तक खपतात. वर्तमानपत्रं वेबसाइटवर आली तरी ते विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे नवं माध्यम हाताळण्याचा प्रश्नच नाही.

* नवीन योजनांबद्दल....

' कहाणी कवितेची ' हे पुस्तक लिहायला घेतलंय. ते येत्या काही दिवसात प्रसिद्ध होईल , ' बाळगलेला ' हे आत्मचरित्र लिहायला घेतलंय.

* या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी काय सांगाल ?

चांगली वैचारिक पातळी ठेवून लिखाण केलं तर त्यातून कसदार साहित्य त्यातून उदयाला येईल. दलित , आदिवासी , मुस्लिम , ख्रिश्चन हे सगळे प्रवाह नवीन असले तरी त्यांनी आपला डोळा घेऊन लिखाण केलं तर त्यांनाही चांगले दिवस आहेत.

संतोष दळवी
( पुनर्प्रकाशित)

(म.टा.वरून साभार)

'माझे विद्यापीठ' आणि काही कविता

कविवर्य नारायण सुर्वे यांची ' माझे विद्यापीठ ' ही कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या या शब्दाशब्द

ातून ती वेदना सारखी ठसठसत राहते, कामगार नावाची गोष्ट सांगत राहते. त्यांची ही आणि आणखी काही कविता....

माझे विद्यापीठ

ना घर होते , ना गणगोत , चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते , मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.

अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता....
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.

मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे , वाचली पाट्यांवरची बाराखडी
व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत ; हातचे राखून कित्येक मारलेले गडी.

हे जातीजातींत बाटलेले वाडे , वस्त्या , दारावरचे तांबडे नंबरी दिवे
सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे.

अशा तांबलेल्या , भाकरीसाठी करपलेल्या , उदास वांदेवाडीच्या वस्तीत
टांगे येत होते , घोडे लोळण घेत होते , उभा होतो नालीचा खोका सांभाळीत.

“ ले , पकड रस्सी-हां-खेच , डरता है ? क्या बम्मनका बेटा है रे तू साले
मजदूर है अपन ; पकड घोडे को ; हां ; यह , वाह रे मेरे छोटे नालवाले. ”

याकुब नालबंदवाला हसे , गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई
“ अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा. ” म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई.

याकुब मेला दंग्यात , नव्हते नाते ; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही
उचलले नाही प्रेत तेव्हा ‘ मिलाद-कलमा ’; च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही.

त्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले , “ हे नारायणा ”
अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट ; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. ”

भेटला हरेक रंगात माणूस , पिता , मित्र , कधी नागवणारा होईन
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून.

तरी का कोण जाणे ! माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने ; वाटते , अजून काही पाहिलेच नाही ,

नाही सापडला खरा माणूस ; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ?
सदंतीस जिने चढून उतरताना , मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ?

आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस , गुटगुटीत , बाळसेदार.
आतः खाटकाने हारीने मांडावीत सोललेली धडे , असे ओळीवर टांगलेले उच्चार

जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात
पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत

हे सगळे पाहून आजही वाटते , “ हे नारायणा , आपण कसे हेलकावतच राहिलो. ’
चुकचुकतो कधी जीव ; वाटते , ह्या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो.

थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता , का आवरला म्यानावरचा हात ,
का नाही घेतले झोकवून स्वतःला , जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात.

विचार करतो गतगोष्टींचा , काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक
उध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.

किती वाचलेत चेहरे , किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव , बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.

खूप सोयरीक करोत आता ग्रंथाची ; वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे परिचारिकेसम , कामगारासम निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले.

जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते ; भरताना तेही बापडे दडतील
स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

वाढले म्हणतात पृथ्वीचे वय , संस्कृतीचेही ; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची
छान झाले ; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची.

ह्या कथाः कढ आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात
रात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करुन सोडतात.

कळले नाहीः तेव्हा याकुब का मेला ? का मणामणाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला ?
का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्या गिधाडाने अल्लद उचलला ?

चंद्रा नायकीण ; शेजारीण , केसांत कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी
पंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुन झुलणारी

अनपड. रोजच विकत घेऊ पेपर , रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई
“ खडे आसा रे माझो झील ; ह्या मेरेर का त्या रे ,” भक्तिभावाने विचारीत जाई.

कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने , ; जगाचा भूगोल होता जवळ
भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन , बराकीवरुन , मलाच कुशीत ओढी जवळ.

मेली ती ; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन
बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन , जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून.

निळ्या छताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी
दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरुन पाठी

वरुन शिव्यांचा कचकोल उडे , “ सिव्वर , इंडियन , काले कुत्ते. ”
हसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते

आफ्रिकी चाचा चिडे , थुंके , म्हणे ; “ काम नही करेगा. ”
चिलमीवर काडी पटवीत मी विचारी , “ चाचा , पेट कैसा भरेगा ?”

धुसफुसे तो , पोट-या ताठ होत , भराभरा भरी रेलच्या वाघिणी
एक दिवस काय झाले ; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी

टरकावले घामेजले खमीस , त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्य बोलला ,

“ हमारा खून झिंदाबाद ! ” वाटले , चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट
खळालल्या नसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल

अडकवून साखळदंडात सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला
“ बेटा! “ गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटून पडला.

कुठे असेल माझा गुरु , कोणत्या खंदकात , का ? बंडवाला बंदीशाळेत
अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात

आता आलोच आहे जगात , वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे ; आपलेसे करायलाच हवे ; कधी दोन घेत ; कधी दोन देत
...................................


विश्वास ठेव

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

(सनद)

..............................................................

तेव्हा एक कर !

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
तेव्हा एक कर
तू निःशंकपणे डोळे पूस.
ठीकच आहे चार दिवस-
उर धपापेल , जीव गुदमरेल.
उतू जणारे हुंदके आवर ,
कढ आवर.
उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस
खुशाल , खुशाल तुला आवदेल असे एक घर कर
मला स्मरून कर ,
हवे अत्र मला विस्मरून कर.

..............................................................

बेतून दिलेले आयुष्य

बेतून दिलेले आयुष्य ; जन्मलो तेव्हा -
प्रकाशही तसाच बेतलेला
बेतलेलेच बोलणे बोललो . कुरकुरत
बेतलेल्याच रस्त्याने चाललो ; परतलो
बेतल्या खोलीत ; बेतलेलेच जगलो
म्हणतात ! बेतलेल्याच रस्त्याने गेलात तर
स्वर्ग मिळेल . बेतलेल्याच चार खांबात
थूः

(म.टा.वरून साभार)

गोष्ट 'उठवळ आयुष्या'च्या माहितीपटाची...

दूर कुठेतरी आगगाडीची खटखट... समोरच्या बंद दाराच्या गिरणीच्या ' भोंग्याची भूपाळी ' सुरू होत

आहे... फटाटू पाहणा-या अंधारात लपत छपत कुणी महिला दबकत्या पावलांनी येते आणि कुणी बघत तर नाही ना , याची खात्री करून घेत आपल्या पदराखालचं दुपट्यात गुंडाळलेलं पोर गिरणीसमोरच्या त्या पदपथावर ठेवते... पदराची ऊब हरपून पहाटवारा चाटून गेलेला तो तान्हा जीव ट्यँहा... ट्यँहा करू लागतो... त्या दुर्दैवी मातेचं मागे वळलेलं पाऊल क्षणभर अडखळतं ; पण दुस-याच क्षणी काळजावर धोंडा ठेवून ती तिथून निघतेच...

भोंग्यासरशी गिरणीचा दिंडीदरवाजा उघडतो नि त्यातून रात्रपाळीच्या कामगारांची पावलं बाहेर पडू लागतात , ती बाहेरचं ते ट्यँहा ट्यँहा कानाआड करूनच! पण एका भल्या माणसाची पावलं मात्र अडतात ; त्याचे हात त्या कुडकुडत्या बाळजिवाला उचलून छातीशी धरतात आणि पडद्यावर पाठमोरे आलेल्या कविवर्य नारायण सुर्वे यांचे शब्द ऐकू येतात- '' मी जन्मताना काही फार मोठा नावलौकिक घेऊन या जगात आलो नाही ; पण या जगातून जाईन तो मात्र ' नारायण गंगाराम सुर्वे ' हे नाव मोठं करूनच! ''

जन्मदात्या आईवडिलांचे नावगाव , जात , धर्म- काही म्हणजे काहीही ठाऊक नसलेलं पदपथावरलं ते बेवारस पोर , नाळठोक्याचा सहाय्यक , चपराशी- अशी अडेल-पडेल ती कामं पोट जाळण्यासाठी करीत , वयाच्या ३१ व्या वर्षी आपल्या मुलाबरोबरीने व्हर्नाकुलर फायनल पास होऊन प्राथमिक शाळेत शिक्षक बनलं आणि आपल्या कवितांच्या बळावर परभणीला झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदापर्यंतची मानाची मजल त्याने चक्क मारली...

या अनाथ मुलाचं (त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर) दैवानं दिलेलं ' उठवळ आयुष्य ' केवळ आपल्या ताकदवान लेखणीने सार्थकी लावलेल्या कविवर्य सुर्वे यांची यशोगाथा काही कमी प्रेरणादायी नाही , याची साक्ष अरुण खोपकर दिग्दर्शित ' नारायण गंगाराम सुर्वे ' हा व्यक्तिचित्रपर , इंग्रजी निम्नशिर्षकांसहितचा मराठी लघुपट देतो. खयाल ट्रस्टचे अमरेंद धनेश्वर यांनी , फोर्ड फाऊंडेशनच्या सहकार्याने निमिर्लेल्या या लघुपटाचा प्रथम-प्रदर्शनाचा खेळ जिंदाल आर्टस क्रिएटिव्ह इंटरअॅक्शन सेंटरने , नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या सहकार्याने टाटा थिएटरमध्ये शुक्रवारी आयोजिला होता. केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या खेळाला मराठी साहित्यविश्व जसं उत्साहाने लोटलं होतं ; तसंच डाव्या चळवळीतील या पूर्णवेळ कार्यर्कत्याचे कॉ. तारा रेड्डी , रंगनाथ कुलकर्णीसारखी सहप्रवासीही आवर्जून आले होते...

पत्रकार/साहित्यिक शांता गोखले यांनी आपल्या या आवडत्या कवीवर लिहिलेल्या व्यक्तिचित्रणात्मक संहितेवर सव्वा वर्षे मेहनत करून खोपकरांनी हा लघुपट दिग्दर्शिला. मुंबई शहरालाच आपलं विद्यापीठ मानणाऱ्या , ग्रंथवाचन करण्यापेक्षाही ' माणूस ' वाचण्याचा आग्रह धरणा-या , अल्पशिक्षित सुर्वे यांच्यातील कृष्णाबाईंशी प्रेमविवाह केलेला माणूस ; कामगाराला जात/धर्म काहीही नसतो-असतो केवळ वर्ण-हे उमजल्यावर डाव्या चळवळीत पडलेला , पण त्या चळवळीचे गुणदोषही जाणतेपणी उमजून घेतलला कार्यकर्ता-असे सुर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू या संहितेत नेमकेपणी उभरून येतात.

मुख्य म्हणजे साध्यासरळ , निष्कपट स्वभावाच्या सुर्वे यांचं वागणं बोलणं जसं साधंसरळ तसंच या चित्रपटातील प्रसंगही दिग्दर्शक उलगडत जातो. खरं तर , त्यात नाट्यमयता आणण्यासाठी सुर्वे यांच्या भूमिकेत कवि-अभिनेता किशोर कदम याचा वापर त्यांनी केला आहे. सुर्वे यांच्या कवितेतील पोस्टरवाला उस्मान्या , गावाकडे पत्र लिहवणारी वारांगना , गोदीतील गोऱ्या साहेबांविरुद्ध फाडलेल्या लाल शर्टाचा बंडाचा बावटा उभारून कवीचा गुरू बनलेला अफगाणीचाचा आदि बोलक्या माणसांचे पडद्यावर दिग्दर्शकाने नाट्यीकरण केलं आहे ; नालठोक्या चाचाकडे बालपणी कवी काम करीत असताना घोड्यांच्या थरारत्या कातडीच्या काव्यगत वर्णनाचंही सादरीकरण होतं ; तरीही पाऊण तासाचा हा चित्रपट कुठेही कृत्रिम होत नाही. ' या सामाजिक वास्तवात आपण जगतो ; त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजेच कविता ' अशी कवितेची सोपी व्याख्या करणाऱ्या या ' सुर्वेनारायणा ' वरील हा लघुपट म्हणूनच स्वत:च एक कविता होऊन गेला आहे...

(म.टा.वरून साभार)

एका जिंदगानीची कविता : प्रकाश अकोलकर

कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते
असे झाले नाही ; आम्ही शब्दांतच इतके नादावलो ; बहकलो
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते

गेली जवळपास पाच दशके शब्दांतच नादावलेल्या नारायण सुर्वे नावाच्या या सिंगल फसली फाटक्या इसमाविषयी लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण त्यामुळेच ते लिहिणे अधिकाधिक कठीण होत चाललं आहे. कारण सुर्वे हे नाव आता मराठी माणसाला तर अनोळखी राहिलेलं नाहीच. शिवाय देश-परदेशातील अनेकांनाही या ' उठवळ ' आयुष्य जगलेल्या कवीविषयी नको तितकं माहीत होऊन गेलं आहे...

डोंगरी शेत माझं ग । मी बेनू किती
आलं वरीस राबू । मी मरावं किती

ही आपली पहिली कविता १९५६ मध्ये लिहिणा-या सुर्व्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कार मिळत गेले. सोविएत रशियाच्या नेहरू पुरस्कारानं बहुधा त्याची सुरवात झाली. एक तपापूवीर् त्यांना पहिला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला.

' माझ्या पहिल्या संपातच । मार्क्स मला असा भेटला ' अशी सुरुवात करून ' निवडणुकीच्या मध्यभागी / माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता ' अशा आठवणीत दंग होऊन गेलेला हा विदोही कवी पुढे यथावकाश मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन प्रस्थापितांच्या मांदियाळीत सामील होऊन गेला... आणि त्यानंतर कोकण मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारलं. तरीही पुरस्कारांनी त्यांची पाठ सोडली नाही. ' भाकरीचा चंद्र शोधण्यातच ' बरबाद झालेल्या सुर्व्यांच्या जिंदगानीची अचूक ओळख महाराष्ट्रा- बाहेरही पटली होती आणि मध्य प्रदेश सरकारनंही ' कबीर पुरस्कार ' देऊन त्यांचा सन्मान केला होता...

... आणि आता नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं दिलेल्या ' जनस्थान पुरस्कारा ' मुळे सुर्वे अधिकच सुखावून गेलेत. कुसुमाग्रजांशी त्यांचे संबंध अगदीच वेगळे आहेत. सुर्व्यांच्या कविता इंग्रजीत अनुवादित होऊन प्रकाशित झाल्या. त्या संग्रहास कुसुमाग्रजांचीच प्रस्तावना होती आणि मुख्य म्हणजे सुर्व्यांच्या प्रतिभेचं सार्मथ्य ज्या अगदी मोजक्याच लोकांनी ही पुरस्कारांची व अध्यक्षपदांची मालिका सुरू होण्यापूर्वीच ओळखलं , त्यात कुसुमाग्रज होतेच होते.

... आणि सुर्व्यांच्या प्रतिभेचं मोलही तेवढंच होतं. ही कविता अगदी ' अस्सल ' होती आणि हा अस्सलपणा कवीला ज्या प्रकारचं आयुष्य जगणं भाग पडलं , त्यातून आला होता. मुळात हे आयुष्य फारच खडतर होतं. इथं आता सुर्वे कवी म्हणून प्रस्थापितांच्या रांगेत जाऊन बसले असले , तरी ते जन्मजात विस्थापित होते. त्यांच्याच शब्दांचा आधार घेऊन सांगायचं झालं तर ' सुर्वे अनाथ मुलगा म्हणूनच जन्माला आले. अर्थात ही काही अभिमानानं सांगायची बाब नाही. ' पण ते पुढे म्हणतात : मी जन्मलो तो काही कोणतं नाम धारण करून जन्मलो नाही. पण मी नसेन तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन -ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे. हे नाव देणारे माझे ' मातापिता ' एका कामगार कुटुंबातील होते. ही मात्र मिरवण्यासारखी आणि अभिमानानं सांगण्याजोगी बाब आहे. '

- आणि हा अभिमान सुर्व्यांनी आयुष्यभर बाळगला. जन्मत:च ' अनाथ ' झालेला हा मुलगा गंगाराम कुशाजी सुर्वे यांना सापडला. हे गंगाराम सुर्वे मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाले म्हणून काम करत आणि त्यांच्या पत्नी काशीबाई या कमला मिलमध्ये. या दांपत्यानं हे सापडलेलं लेकरू घरी आणलं आणि सुर्व्यांना नवा जन्म व नारायण हे नाव दिलं. एवढंच नव्हे तर घरात अठरा विश्वं दारिद्र्य असतानाही त्यास माहीमच्या शाळेतही घातलं. १९३६ साली सुर्वे चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे निवृत्ती स्वीकारून गावी निघून गेले. सुर्वे पुन्हा एकदा अनाथ झाले...

' ना घर होते / ना गणगोत ' अशी त्यांची अवस्था होती. पण सुर्वे हडबडले नाहीत.

चालेल तेवढी
पायाखाली जमीन होती
दुकानांचे आडोसे होते
मोफत नगरपालिकेची फुटपाथ
खुलीच होती

हेच सुर्व्यांचं विद्यापीठ होतं... या विद्यापीठानं सुर्व्यांचं जीवन भलतंच समृद्ध करून सोडलं. तिथं त्यांना भलेभले लोक भेटले. व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा देण्याआधीच शाहीर अमरशेख , अण्णाभाऊ साठे , शाहीर गंगाराम गव्हाणकर आदींच्या ताफ्यात सुर्वे सामील झाले होते... त्यातून झालेले विदोहाचे संस्कार सुर्वे आजही मनाशी बाळगून आहेत. तो काळच बंडखोरीचा होता. बाहेर गांधी-नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी रान उठवलं होतं आणि घराच्या परिसरात कॉम्रेड डांगे गिरणी मालकांच्या विरोधात लाल बावटा घेऊन उभे होते. सुर्वे सांगतात : सह्यादी घाट उतरून पोटासाठी कामगार झालेल्या , मानसिकदृष्ट्या अर्धा शेतकरी आणि अर्धा कामगार असलेल्या श्रमिकांच्या वस्त्या वाढत होत्या... शिवाय कोकणातील चाकरमान्यांचीही भली मोठी गर्दी मुंबईत होतीच. ही मुंबईच सुर्व्यांची मुंबई. म्हणूनच

पटकूर खांद्यावर टाकून , सह्यादी घाट उतरून
माझा बाप तुझ्या दारावर उभा राहिला श्रम घेऊन

असं ' मुंबई ' या कवितेत सुर्वे सहजपणे लिहून गेले... पण सुर्व्यांना परिस्थितीचं भानही होतं. त्यामुळेच दररोज स्वत:ला धीर देत जगणे ; कठीण होत आहे

किती आवरावे आपणच आपणाला ; कठीण होत आहे

अशी जाहीर कबुलीही सुर्वे देतात. पण शब्दांतच नादावलेले आणि बहकलेले असूनही सुर्व्यांचं वास्तवाचं भान काही अपवाद वगळता सुटलं नाही. म्हणूनच एकीकडे मढेर्करांना साद घालताना सुवेर् गिरणीची लावणीही लिहीत राहिले... आणि त्याच वेळी ' तुमचंच नाव लिवा... ' अशी मास्तरांची विदारक पण वास्तवाचं भेसूर चित्र उभं करणारी विनवणीही त्यांच्या कवितेतून उमटू शकली. पण आता हे सारं आपल्या हाताबाहेर जात चाललं आहे , याचा कबुलीजबाब देण्याइतपत धैर्यही त्यांच्याकडे काही दशकांपूर्वीच आलेलं होतं.

कबूल...
आजच्याइतके आयुष्य काल कठोर नव्हते
आजच्याइतके पालखीचे भोई काल थकलेले नव्हते

हा म्हणाल तर ' नॉस्टॅल्जिया ' होता. पण त्याने ' रोमँटिक ' कवींनी रूढ केलेला ' नोस्टॅल्जिया ' चा पारंपरिक अर्थ पुरता पालटून टाकला होता. त्यांच्या कवितेचं रसायन अनेकदा छान जमून जातं पण त्यामुळे तेही अनेकदा हादरून गेले आहेत. असे हादरे त्यांच्या मनाला अनेकदा बसत गेले आणि त्यातूनच त्यांची कविता अधिकाधिक तप्त आणि प्रस्थापित वास्तवाला कठोर हादरे आणि फटके देत गेली. ' उगीच कुणाला सलाम ठोकणे जमलेच नाही ' अशा प्रवृत्तीतून जन्मलेली ही कविता म्हणूनच आज पाच दशके सर्वांच्या मनात रुजत गेली...

वयाची ऐंशी पार केलेल्या सुर्व्यांना आपल्या कवितेचा रास्त अभिमान आहे. म्हणूनच ते म्हणू शकले :

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते
चला बरे झाले ; आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते.

(म.टा.वरून साभार)

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार