शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

स्वत:लाच रचीत गेलो...

* जन्म : १९२६



*कौटुंबिक आणि पूर्वायुष्य : गंगाराम सुवेर् यांनी सापडलेल्या मुलाला वडिलांची माया आणि नारायण हे नाव दिले - वडील गिरणी कामगार - काही काळ स्वत:ही गिरणीत कामाला त्यामुळे श्रमिकांचे जग जवळून पाहिले- काही काळ शिपाई, प्राथमिक शिक्षक म्हणून नोकऱ्या

* १९५६च्या सुमारास काव्यलेखनाला सुरुवात - युगांतर, नवयुग, मराठा या वर्तमानपत्रांतून कविता प्रसिद्ध

* १९६२मध्ये 'ऐसा गा मी ब्रह्मा' हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध. या संग्रहातील कविता कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर 'लढाऊ वृत्तीची, समाजक्रांतीची उपासना करणारी' होती.

*'माझे विद्यापीठ' (१९६६) हा दुसरा संग्रह. यात 'ना घर ना गणगोत' अशा स्थितीत 'तांबलेल्या, भाकरीसाठी करपलेल्या' उदास वस्तीच्या पोटासाठी झिजणाऱ्यांचे दाहक विश्व- मिळेल ते काम करणारी माणसे, कामगार, वेश्या, पोस्टर चिकटवणारी पोरं अशा समाजातील 'उपेक्षितां'च्या वेदना सजीव करणारी कविता.

* शरच्चंद, विंदा या सुर्व्यांच्या आधीच्या साम्यवादी कवींच्या कवितेतील वास्तवापेक्षा सुर्व्यांच्या कवितेतील वास्तव प्रत्यक्षाला अधिक भिडणारे

* 'जाहीरनामा' (१९७५), 'सनद' (संपादित निवडक कविता १९८२), 'नव्या माणसाचे आगमन' (१९९५) हे संग्रह प्रसिद्ध.

* नारायण सुर्व्यांच्या अप्रकाशित कविता 'नारायण सुवेर् यांच्या गवसलेल्या कविता' या नावाने १९९५मध्ये विजय तापस यांनी संपादित केल्या आहेत.

* 'माणूस, कलावंत आणि समाज' (१९९२) या संग्रहात त्यांचे वैचारिक लेख, अण्णाभाऊ साठे, कुसुमाग्रज, कुरूंदकर आदींबद्दल काही व्यक्तिचित्रात्मक लेख आणि त्यांच्या मुलाखती यांचा समावेश.

*'तीन गुंड व सात कथा', 'दादर पुलाखालची मुले' हे त्यांनी केलेले अनुवाद. तसेच 'कविता श्रमाची', 'गाणी चळवळीची' ही त्यांची संपादित पुस्तके.

* संथ, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी अशी विशिष्ट शैली सुर्व्यांनी निर्माण केली.

* व्यक्तिगत अनुभव आणि सामाजिक जीवनाशी बांधलेली अशी दुहेरी पिळाची सुर्व्यांची कविता जीवनातील दु:खामागे असलेले, समाजरचनेतील विषमता, हे कारण जाणते. त्यामुळे त्यांच्या कवितेत मार्क्सवादी दृष्टीकोन.

*जग बदलून टाकण्याच्या माणसाच्या क्षमतेवरील विश्वास, जीवनातील आव्हाने पेलण्याच्या ताकदीवरील श्रद्धा यातून त्यांच्या कवितेत आशावाद.

* मराठी कवितेला मध्यमवगीर्य वर्तुळातून बाहेर काढण्याचे काम सुर्व्यांच्या कवितेने केले.

*राज्यभरात गावोगावी जाऊन कवितांचे कार्यक्रम सुर्व्यांनी केले. त्यांच्या कवितेला समाजातील सर्व स्तरांतील लोकांची पसंती मिळाली.

(म.टा.वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार