शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

तळकोकणाची बोली सर्वदूर पोहोचवली : मधुसूदन नानिवडेकर

भुईबावडा घाटाच्या पायथ्याच्या वैभववाडी तालुक्यातील 'हेत' हे मुंबईत गिरणी कामगार असलेल्या गंगाराम सुवेर् यांचे मूळ गाव. गंगाराम सुवेर् यांनी नारायणाचा सांभाळ केला. गिरणी कामगार वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या नारायण सुवेर्ंनी अनेक चळवळीत भाग घेऊन फड गाजवले.

सुवेर्ंना या हेतच्या भूमीशी कृतज्ञ राहून इथली किंचित राजापुरी वळणाची मालवणी भाषा, या भागातील स्त्रियांचे अनुभवविश्व आपल्या कवितेतून उभे केले. तळकोकणाची बोलीभाषा सर्वदूर पोहोचवली. 'डोंगरी होतं माझं ग शेत मी बेनू किती' या शाहीर अमरशेख यांनी म्हटलेल्या गीताने त्या काळी रसिकांवर गारूड केले होते. 'कवळाचे भारे बाई घेऊन चढावं किती... आडाचं पानी बाई पानी वडावं किती,' या ओळींतून त्यांनी तळकोकणातल्या स्त्रियांच्या व्यथा मांडल्या. आजही राजापूरच्या हद्दीवरील या डोंगराळ भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या स्त्रिया हेच जीवन जगत आहेत! 'कुठल्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमकते रस्त्यावर.. पाणी आणायला जाऊ की नको, काय ते पत्रात लिवा..' य ागाण्यातून त्यांनी कोकणच्या स्त्रियांची घुसमट व्यक्त केली. मुंबईतला चाकरमानी आणि त्याचे मुलखातले घर यांचा अनुबंध कवितेतून स्पष्ट करत सुवेर्ंनी दक्षिण कोकणच्या श्रमिकांचा आवाज, शेतकऱ्यांच्या जीवनातले बारकावे, ग्रामीण जीवनातले मानवी व्यवहार तथाकथित चाकरमान्यांची ऐट सर्वांचच चित्रण कवितेतून व्यक्त करत आपल्या भूमीतील अनुुभवविश्व सर्वदूर पोहोचवले.

हेत गावच्या शेवरी फाट्यानजीक सुवेर्ंचे घर आहे. त्यांचे चुलत भाऊ येथे राहतात. सुवेर् १९९४ साली हेत या त्यांच्या गावी आले होते. तीन-चार दिवस त्यांनी येथे मुक्काम करून परिसरातल्या मंडळींशी संवाद साधला होता. हेत हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर कार्यक्रमही झाला होता. खारेपाटणपासून ३० किमी अंतरावर हेत गाव आहे. पूवीर् मुंबईहून येताना खारेपाटणला उतरून पुढे चालत जावे लागे. सुवेर् अभिमानाने सांगत, 'मा खारेपाटणचा. अलीकडे वैभववाडी तालुक्याची निमिर्ती झाली, त्यात हेत गावचा समावेश झाला. पूवीर्चा गगनबावडा तालुका..' वैभववाडीचे वैभव म्हणून सुवेर् हा या तालुक्याच्या अभिमानाचा विषय झाला आहे.

(म.टा.वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार