शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

योद्धा! : नामदेव ढसाळ

नारायण सुर्वे यांच्या निधनामुळे मराठी साहित्यातील सांस्कृतिक मिरासदारीविरोधातल्या लढाईत शीर्षस्थानी असलेला कवी , योद्धा हरपला आहे ... या भावना नोंदवल्या आहेत ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांनी .
...................

सुर्वेसर गेल्यानंतरच्या बातम्या मी टीव्हीवर पाहात होतो . मान्यवर कवी - समीक्षकांनी त्यांच्याबद्दलचा लावलेला सूर मजेशीर होता . ते म्हणत होते , ' सुवेर् यांच्या निधनाने सूर्यास्त झाला .' सुर्वे हे स्वत : ला सूर्यकुलातले कवी म्हणायचे . शोषित - कष्टकऱ्यांचं जग साहित्यात प्रस्थापित करताना त्यांनी सूर्याची प्रतिमा सतत वापरली . या प्रतिमेची नुसती द्वाहीच फिरवली नाही , तर तीही प्रस्थापित करण्याचा जिवंत प्रयत्न केला . हे सूर्यतेज साहित्यात आता अधिक प्रखर झालं आहे . त्यामुळे सुवेर्सरांच्या जाण्याने सूर्यास्त झाला , असं मी म्हणणार नाही . त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यातील सांस्कृतिक मिरासदारीविरोधातल्या लढाईतला शीर्षस्थानी असलेला कवी हरपला , असं मात्र मी नक्कीच म्हणेन .

कुर्निसात

मराठी साहित्यात दलित - शोषितांच्या वेदनेला , दु : खाला फारसं स्थान नव्हतं . तिथे मोठीच पोकळी होती . पण नारायण सुर्वेंनी मार्क्सवाद हे आपल्या साहित्याचं अधिष्ठान बनवत सांस्कृतिक मिरासदारीविरोधाच्या लढाईत उतरत मराठी साहित्यातला मोठाच खड्डा बुजवला , ही साहित्याला ललामभूत ठरणारी गोष्ट आहे . ही लढाई अटळ आहे आणि अजूनही ती अंतिम टप्प्यात आलेली नाही . मराठी कवितेला स्वप्नरंजनातून सोडवण्याचं मोठं काम मढेर्करांनी केलं तरी वास्तवातले अंतविर्रोध पकडून दलित - शोषितांच्या अभिव्यक्तीला स्थान देण्याचं काम त्यांनी केलं नाही . त्यांच्या आधी केशवसुतांनी ते केलं . केशवसुतांवर ' गोल्डन ट्रेझरी ' वाले कवी म्हणून टीका होते ; पण आधुनिक मराठी कवितेची सुरुवात त्यांच्यापासून होते . त्यांनी मानवी मूल्यांना तात्त्विक बैठक दिली हे नाकारता येणार नाही . सौंदर्यवादी आणि जीवनवादी असे प्रवाह तेव्हाही साहित्यात होते . त्याला साठच्या दशकात थेट प्रस्थापित विरूद्ध बिगर प्रस्थापित असं स्वरूप येऊन जी झुंपी झाली त्यात नारायण सुवेर् अग्रभागी होते .

सुर्वेसर मला दीपस्तंभासारखे वाटतात . आम्ही जी लढाई लढत होतो तीच सुर्व्यांचीही लढाई होती , त्यामुळे आमचे ऋणानुबंध होते . मी सुर्वेंच्या बाबतीत मनस्वी होतो . मला आठवतं , ते चिंचपोकळीच्या पुलावरून येत होते . मी समोरून येत होतो . त्यांना बघताच मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला , अशी आमच्या पहिल्या भेटीची आठवण आहे . आम्ही जीवनवादी लोक प्रतिभेला दैवी देणगी मानत नाही . प्रतिभा ही खडतर जीवनातून अधिक परिपक्व होते , स्वत : कडे आणि समाजसंबंधाकडे डोळसपणे पाहिलं तर द्विगुणित होते , असं मी मानतो . सुवेर् याचं साक्षात उदाहरण आहेत . त्यामुळेच त्यांची भाषाही जबरदस्त झाली .' ऐसा गा मी ब्रह्मा ' मधल्या त्यांच्या कविता अप्रतिम आहेत . कामगार जाणिवेने भारलेल्या आहेत . साम्यवादी राजकीय बांधिलकी मानणाऱ्या या कवीने शब्दांचा हत्यारासारखा वापर केलेला दिसतो . ' इथून शब्दांच्या हाती खड्ग मी ठेवीत आलो ', असं ते म्हणतात . कवितेची चळवळ चालवत सदा कऱ्हाडे , बाबुराव बागुल , प्र . श्री . नेरूरकर , सुभाष सोमण , केशव मेश्राम यांना घेऊन प्रगत साहित्य सभेचं धुरिणत्व स्वीकारतानाही दिसतात .

माझा सुर्वेच्याबद्दल आक्षेप फक्त एवढाच आहे की कामगारांच्या बालेकिल्ल्यात राहून सत्तरच्या दशकापर्यंत तिथली सगळी स्पंदनं प्रभावीपणे टिपणारा हा कवी तिथेच नंतर झालेले राजकीय बदल आणि कामगार वर्गातली स्थित्यंतरं याबाबत मूक राहतो . चळवळीचं अध : पतन होताना त्यातले अंतविर्रोध मांडत नाही . पुढच्या अपयशाबद्दल बोलत नाही . अर्थात असं असलं तरीही सर्वहारांचा लढा साहित्यात प्रस्थापित करण्याचं मोठंच काम सुर्वेंनी केलं आहे . त्यांनी या लढाईला आरंभ केला आणि ती व्यापक केली . याबद्दल आम्ही त्यांचं उत्तरदायित्व मान्य करून त्यांना कुर्निसात करतो .

(म.टा.वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार