शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

माती

भिंतीत खिळे ठोकताना
माती प्रतिकार करीत नाही
कॉंक्रिटसारखा;
उलट ती क्षमा करून टाकते तुम्हाला
ख्रिस्तासारखी.
सारवताना सुगंधही देते फुलासारखी.

तुम्ही अडकवा खिळ्याला ओझे
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत.
पण अति होता
ती खिळ्याला खिळखिळ करून
उखडून फेकते ओझ्यासकट
हा मातीचा स्वभाव आहे.

- दिनेश गावंडे
९३७२४५११५४
(कविता-रती/जुलै-ऑगस्ट २००७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार